
Where can I study stock market? how to learn stock market?
नमस्कार मित्रांनो, आजचे आर्टिकल मी त्या लोकांसाठी लिहीत आहे ज्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे आहे परंतु सुरुवात कुठून करावी हे माहीत नाही .अशा लोकांसाठी मी माझ्या दहा वर्षाच्या शेअर मार्केटच्या अनुभवाच्या जोरावर आपणास मार्गदर्शन करणार आहे.
मानववंश शास्त्रज्ञ क्लॉड लेव्ही म्हणतो-“The wise man doesn’t give the right answers, he poses the right questions.” अर्थात शहाणा माणूस योग्य उत्तरे देत नाही, तो योग्य प्रश्न मांडतो.
हे सांगण्याचे कारण की शेअर मार्केट मध्ये नवीन येणारा माणूस नेहमी इतरांना कोणता शेअर बाय करू? पटकन रिटर्न देणारा एखादा स्टॉक सांग ना ? असे प्रश्न विचारतो परंतु असे प्रश्न विचारणारा हा कधीच यशस्वी होऊ शकत नाही. यासाठी तुम्ही योग्य प्रश्न विचारणे महत्वाचे आहे आणि तो योग्य प्रश्न हा आहे की तुम्ही योग्य शेअर्स कसे निवडतात? मित्रांनो टिप्स या तात्पुरत्या स्वरूपात कदाचित तुम्हाला फायदा देतील परंतु शेवटी ते तुमच्या नुकसानीस कारणीभूत होती परंतु तुम्ही जर स्वतः शिकला तर ते तुम्हाला शेवटी यश देईन. तेव्हा तुम्ही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा ,मी तुमच्या मदतीला सदैव आहे.
सुरुवात कुठून करावी?
सर्वात आधी तुम्ही शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय? ते कसे चालते? शेअर्स कुठून येतात ? त्यांची देवाण-घेवाण कशी होते? कुठे होते? हे समजून घेणे सर्वात आधी महत्वाचे? त्यांची उत्तरे सहज तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकतात..
मित्रांनो आपण कोणत्याही अनोळखी प्रदेशात जर कामानिमित्त गेलो तर आपल्याला त्या ठिकाणाची भाषा जर अवगत झाली तर आपल्याला प्रगती करण्यास सोपे होते याप्रमाणेच शेअर मार्केटमध्ये जर आपणास काम करायचे असेल तर शेअर मार्केटची भाषा आपणास अवगत करणे गरजेचे आहे आणि ते तुमच्या पुढच्या यशा साठी महत्त्वाची ठरणार आहे.
तर ही भाषा कशी अवगत करायची ?यासाठी तुम्हाला काय शिकावे लागणार ? –
A)फंडामेंटल अनालिसिस–
यामध्ये परिमाणात्मक आणि गुणात्मक (quantitative and qualitative) एनालिसिस करणे आपल्याला शिकावे लागेल.
1) गुणात्मक फंडामेंटल अनालिसिस (quantitative fundamental analysis )-
बॅलन्स शीट अनालिसिस , इन्कम स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट ,कंपनीचे वार्षिक रिपोर्ट समजून घेणे हा झाला quantitative फंडामेंटल एनालिसिस चा एक भाग .
2)परिमाणात्मक फंडामेंटल अनालिसिस (qualitative fundamental analysis)
कंपनीच्या व्यवस्थापनाविषयी चा अभ्यास, कंपनी कोणी सुरू केली ? कंपनी त्याआधी काही भ्रष्टाचार वगैरे झाला नाही ना ?कंपनीच्या पूर्वीचा ट्रॅक रेकॉर्ड समजून घेणे, इत्यादी गोष्टींचा अभ्यास म्हणजे qualitative फंडामेंटल अनालिसिस म्हणजे थोडक्यात कंपनीची क्वालिटी समजून घेणे. अशा सर्व प्रकारचा अभ्यास तुम्ही केल्यानंतर तुम्ही योग्य कंपनीचे शेअर्स निवडू शकतात.
B) टेक्निकल ऍनालिसिस(technical analysis)–
शेअर्स विकत घेण्याची योग्य वेळ तुम्हाला टेक्निकल ऍनालिसिस सांगते . फंडामेंटल अनालिसिस द्वारे तुम्ही चांगल्या कंपनीचे शेअर्स कसे निवडायचे हे शिकाल परंतु पुढची पायरी म्हणजे या चांगल्या कंपनीचे शेअर्स कोणत्या वेळी घ्यायचे ,योग्य वेळ जर असेल तरच तुम्हाला गुंतवणुकीवर रिटर्न्स म्हणजेच परतावा मिळण्याची शास्वती असते जर तुम्ही योग्य शेअर्स निवडले परंतु विकत घेण्याची वेळ चुकीची ठरली तरी तुम्ही नुकसानस सामोरे जाल. शेअर्स बाय करण्याची योग्य वेळ कशी निवडायची हे तुम्हाला टेक्निकल एनालिसिस च्या अभ्यासाने कळते. टेक्निकल ऍनालिसिस मध्ये आपण शेअरच्या किमतीचा भूतकाळातील डाटा च्या आधारे चार्ट स्वरूपात अभ्यास करतो, यामध्ये आपण शेअरची ची डिमांड झोन ( कोणत्या किमतीला आल्यानंतर शेअर मध्ये मागणी येते) सप्लाय झोन ( कोणत्या किमतीला आल्यानंतर शेअर मध्ये पुरवठा येतो) , सपोर्ट , रेजिस्टन्स याची माहिती मिळवतो आणि शेअर्स केव्हा विकत घ्यायची याची योग्य वेळ निवडतो. मित्रांनो काय शिकायचं हे आपण आता शिकलो आहोत परंतु कुठून शिकायचं ते आता आपण पाहूयात.
कुठून शिकावे-
इंटरनेटच्या मदतीने- तुम्ही गुगल वरून युट्युब वरून बरीच माहिती मोफत वाचू शकाल परंतु तिथे एक तोटा आहे भरमसाठ माहिती असल्याकारणाने योग्य आणि कामाची माहिती निवडणे थोडे अवघड आहे
दुसरा पर्याय –कोर्सेस, तुम्ही ऑफलाइन म्हणजे अगदी वर्गात जाऊन किंवा ऑनलाइन कोर्सेस निवडू शकता. सध्या बाजारात भरपूर ऑनलाइन ऑफलाइन कोर्सेस उपलब्ध आहे, कोर्स निवडताना तुम्ही त्या संस्थेबद्दल थोडीशी पूर्ण माहिती घेतली तर बरे राहील. तुम्ही डायरेक्ट एनसीसीच्या (NSE) अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा काही कोर्सेस करू शकता तेही खूप कमी फी मध्ये सोबत प्रमाणपत्रही मिळू शकतात.
खाली काही लोकप्रिय कोर्सेस देणाऱ्या संस्थेची मी माहिती देत आहे, जरुरी नाही की तुम्ही इथूनच कोर्सेस करावे.
NSE- या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही वेगवेगळे कोर्सेस निवडू शकता
https://www.nseindia.com/learn/recorded-courses
तिसरा पर्याय- पुस्तके, माझ्या सर्वात आवडीचा प्रकार, पुस्तकातून आपल्याला सर्वात खात्रीलायक माहिती मिळते. खाली मी काही पुस्तकांची यादी देत आहे ही पुस्तके नक्कीच तुमच्या ज्ञानात अमुलाग्र बदल करतील तुम्ही जरी कोर्सचा पर्याय निवडला तरी या पुस्तकांना जरूर संग्रहित करा.
फंडामेंटल अनालिसिस साठी पुस्तक-
Romancing the BALANCE SHEET Book by Anil Lamba https://amzn.to/3qhsBqv– हे पुस्तक तुम्हाला डिटेल मध्ये खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला बॅलन्स शीट अनालिसिस, इन्कम स्टेटमेंट अनालिसिस, कॅश फ्लो अनालिसिस शिकवेल तुम्ही कोणत्याही शाखेचे विद्यार्थी असाल तरी तुम्हाला हे पुस्तक खूप सोप्या भाषेमध्ये सर्व काही समजून सांगते. हे पुस्तक नवीन लोकांसोबत अनुभवी लोकांना सुद्धा खूप फायद्याचे आहे. साधारण याची किंमत पाचशे ते सहाशे रुपये आहे.
टेक्निकल अनालिसिस साठी पुस्तक-
Technical Analysis of the Financial Markets-Book by John Murphy https://amzn.to/3qaJzGN– नवीन लोकांसाठी हे पुस्तक खूप मार्गदर्शक आहे या पुस्तकामध्ये टेक्निकल ऍनालिसिस साठी उपयुक्त असणाऱ्या सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत सांगितल्या आहेत हे एक पुस्तक तुम्हाला टेक्निकल अनालिसिस संबंधित सर्व प्रकारची माहिती देण्यास समर्थ आहे. यामध्ये चार्ट , चार्ट चे प्रकार, कॅन्डल स्टिक पॅटर्न, प्राईज ॲक्शन, डाव थेरी, वेगवेगळे इंडिकेटर्स आणि त्यांचा वापर हे सर्व या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
साधारण हजार रुपयापर्यंत हे पुस्तक आपल्याला विकत मिळू शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा,

Financial Advisor | Certified Equity Research Analyst
ARN No. 250611