
सर्वसाधारण भारतीय पालकांचं प्रथम ध्येय आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करणे हेच असते आणि त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या भविष्यासाठी पालक आपल्याकडे असणारी आयुष्यभर साठवलेली बचत ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करतात अगदी रिटायरमेंट चा मिळालेला सर्व पैसा ते आपल्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी खर्च करतात आणि त्यात मुलगी असेल तर पालकांना तिच्या भविष्यासाठी आणखी जास्त काळजी असल्याचे आपण भारतीय कुटुंबामध्ये पाहतो यासाठीच भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना 2015 साली राबवली आहे आणि सरकार सुद्धा पालकांनी आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांना गुंतवणुकी प्रवृत्त करत आहे परंतु मित्रांनो तुम्ही जर वेळीच योग्य गुंतवणूक केली तर तुम्ही मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित करालच परंतु आयुष्याच्या शेवटी सुद्धा तुम्ही आत्मनिर्भर आणि मानाने जगू शकाल.
2015 साली सुरू झालेली ही योजना ज्या पालकांना लहान मुलगी आहे अशा कुटुंबामध्ये ही योजना खूप लोकप्रिय झाली आहे, कारण ही योजना टॅक्स फ्री 8% परतावा देते, ही योजना EEE या टॅक्सेशन स्टेटस मध्ये अंतर्गत आहे.
Exempt -Exempt-Exempt or EEE status –
म्हणजे अशी कर बचत योजना ज्यामध्ये उदाहरणार्थ, तुम्ही या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक केल्यास, तुमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीवर सुद्धा तुम्हाला (मुद्दल रकमेवर) कर लागणार नाही .
आणखी एक फायदा असा आहे की तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळवू शकता आणि व्याज सुद्धा पूर्णपणे करमुक्त आहे.
EEE कर सवलतीमधील तिसरी आणि अंतिम सूट ही आहे की जेव्हा तुमची गुंतवणूक परिपक्व होते तेव्हा जमा केलेले व्याज किंवा मूळ रक्कम दोन्हीवर कर आकारला जाणार नाही.
परंतु मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना बऱ्याच वेळा तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी परिपूर्ण नाही याचं कारण म्हणजे
नियमाप्रमाणे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडल्यानंतर ती तिथपासून 21 वर्षानंतर मॅच्युअर म्हणजेच परिपक्व होते परंतु इथेच काही पालकांमध्ये गोंधळ होतो त्यांना असे वाटते की मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर ते खाते मॅच्युअर होणार आहे पण हे बरोबर नाही सुकन्या समृद्धी योजनेची मॅच्युरिटी ही खाते उघडल्यानंतर 21 वर्षांनी होते( यात मुलीच्या वयाशी संबंध नाही- उघडले च्या तारखेपासून 21 वर्षांनी तुमची स्कीम मॅच्युअर म्हणजेच परिपक्व होणार आहे) तसेच तुम्हाला या योजनेत फक्त 15 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येणार आहे तीही 1.5 लाखा पेक्षा जास्त नाही.
उदाहरणासाठी असं समजू की तुमची मुलगी आता पाच वर्षाची झाली आणि आता तुम्हाला तिच्या भविष्याची काळजी वाटू लागली आणि त्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजना हे खाते उघडले आणि पुढचे 15 वर्ष सलग 1.5 लाख प्रतिवर्षी तुम्ही त्यात गुंतवणूक केली,
आता जेव्हा तुमची मुलगी 18 वर्षाची होईल त्या वेळेस तुम्हाला तिच्या उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज पडेल परंतु तोपर्यंत तुमच्या सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्याला फक्त 13 -14 वर्षे पूर्ण झालेली असतील.
आता आपण असे समजू की 8% रिटर्न ( परताव्या प्रमाणे) तुमच्या खात्यावर साधारण 39 लाख जमा झाले असतील परंतु तरीही तुम्ही ती रक्कम पूर्णपणे वापरू शकत नाही जरी तिची तुम्हाला अत्यंत गरज असेल तरीही,
कारण सुकन्या योजनेचा नियमच सांगतो की तुम्ही 50% पेक्षा जास्त रक्कम तिच्या उच्च शिक्षणासाठी काढू शकत नाही, आता तुम्ही पहाल याप्रमाणे तुम्हाला साधारण 19 ते 20 लाख रुपये काढता येतील
आता तुम्हीच सांगा सध्याची उच्च शिक्षणासाठी लागणारा खर्च पाहता 13- 14 वर्षानंतर 19 ते 20 लाख रुपये पुरेसे आहेत का? शक्यतो नाही? कारण आजच्या घडीला इंजीनियरिंग किंवा मेडिकल साठी किंवा तत्सम उच्च शिक्षणासाठी 20-25 लाख सुद्धा पुरत नाही आणि हीच रक्कम शिक्षणातील महागाई पाहता ही रक्कम 13-14 वर्षानंतर 70 ते 80 लाख रुपये होते, आणि सुकन्या योजना तर आपल्याला फक्त 19 ते 20 लाख रुपये देऊ शकते.
आता तुमच्या लक्षात आले असेल की करमुक्त 8% रिटर्न सुद्धा तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी कमी पडतात.
म्युच्युअल फंड आणि सुकन्या समृद्धी योजनेची सांगड घालून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता !
जर तुमची मुलगी अजूनही लहान असेल आणि तुमच्याकडे तिच्या उच्च शिक्षणासाठी 12-15 वर्षे शिल्लक असतील तर तुम्ही म्युच्युअल फंडचा मार्ग स्वीकारायला हवा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून साधारण 12% व जास्त रिटर्न्स म्हणजेच परतावा कमवू शकतात, नेहमी लक्षात ठेवा शिक्षणाचा महागाई दर हा दैनंदिन जीवनातल्या महागाई पेक्षा जास्त असतो.
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी कराल-
असं समजू मुलीला उच्च शिक्षणासाठी आणखी 12-13 वर्ष शिल्लक आहेत अशावेळी
तुम्ही जर अग्रेसिव्ह धोरण स्वीकारले तर
70 ते 75 टक्के गुंतवणूक तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये व 25 ते 30 टक्के गुंतवणूक सुकन्या योजनेत करा
जर तुम्हाला समतोल धोरण स्वीकारायचे असेल तर- तुम्ही 45 ते 55 टक्के रक्कम सुकन्या योजनेत व म्युच्युअल फंड मध्ये विभागून टाका
जर तुम्ही खूप सावधगिरीचे दोनच स्वीकारणार असाल तर- 20 ते 30 टक्के रक्कम तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये 70 ते 80 टक्के रक्कम तुम्ही सुकन्या योजनेत गुंतवणूक करा.
निश्चितच सुकन्या योजना एक चांगली योजना आहे परंतु तुम्ही त्या योजने कडे बॅलन्स आणि सावधगिरीचे धोरण म्हणून पहा आणि सोबत म्युच्युअल फंड ची सांगड घाला म्हणजे मोक्याच्या वेळी तुम्हाला पैशांची उणीव भासणार नाही व तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित तर करालच परंतु स्वतःच्या भविष्याला सुद्धा सुरक्षित ठेवाल.
AMFI Registered Mutual Fund Distributor
ARN.250611